Turkey Syria Earthquake : पहाटे शक्तिशाली भूकंप झाला आणि शेकडो लोक इमारतीखाली गाडले गेले
#BBCMarathi
तुर्कीत सीरियाच्या सीमेनजीकच्या भागात सोमवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास शक्तिशाली भूकंप झाला. त्यानंतर पुन्हा आता भूकंपाचा झटका तुर्कीत जाणवला आहे. नव्या भूकंपाची तीव्रता 7.5 इतकी आहे. आतापर्यंत दोन्ही देशांत मिळून दोन हजार लोकांचा जीव गेला आहे. हा आकडा वेगाने वाढत आहे असंही त्यांनी सांगितलं. 3000हून अधिक नागरिक या भूकंपात जखमी झाल्याचंही त्यांनी सांगितलं. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.8 अशी नोंदली गेली. भूकंपाची तीव्रता लक्षात घेऊन राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. भूकंपात अडकलेल्या लोकांच्या सुटकेचं काम सुरु आहे.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
-
类别
没有找到评论